उद्योजक निखिल मुथा यांचे घर फोडून ८७ लाखांच्या दागिन्यांची लूट, सिडको एन १ मधील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्याने तब्बल ८७ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. ही खळबळजनक घटना शनिवारी (१३ जुलै) ला रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्‍यान सिडको एन-१ मध्ये घडली. निखील सुशिल मुथा (वय ४१, रा. एफ-सेक्टर सिडको एन-१ गरवारे स्टेडियएममागे) यांनी या प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यांचे प्रोझोन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्याने तब्बल ८७ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. ही खळबळजनक घटना शनिवारी (१३ जुलै) ला रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्‍यान सिडको एन-१ मध्ये घडली.

निखील सुशिल मुथा (वय ४१, रा. एफ-सेक्टर सिडको एन-१ गरवारे स्टेडियएममागे) यांनी या प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यांचे प्रोझोन मॉलच्या बाजूला गोल्डन सिटी सेंटर MIDC चिकलठाणा येथे डॉक्टरांना लागणाऱ्या सर्जिकल साहित्‍य विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी (१३ जुलै) रात्री आठला मुथा कुटुंबीयांना प्रोझोन मॉलमध्ये बूट खरेदी करायचे असल्याने निखिल यांच्यासह त्‍यांची पत्नी प्रियांका, आई व वडील, दोन्ही मुले घराला लॉक लावून आले होते. खरेदी केल्यानंतर मुथा कुटुंब रात्री साडेनऊला घरी आले असता मेन गेट उघडे दिसले.

घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. प्रत्येक रूमचे लाईट चालू दिसले. घराता जाऊन पाहिले असता डाव्या बाजूच्या रुममधील दक्षिणेकडील खिडकीचे लोखंडी गज चारही बाजूने कटरच्या साहायाने कट केलेले व त्यातून कोणीतरी चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे आढळले. त्‍यामुळे मुथा यांनी घरातील कपाटांची पाहणी केली असता पत्नीचे ८७ लाख ६९ हजार रुपयांचे सोने व हिऱ्याचे, चांदीचे व मोत्याचे दागिने व व आईचे कपाटातील २४ हजार रुपये व चांदीचे शिक्के व बाऊल दिसले नाहीत. हॉलमधील स्टुलवर ठेवलेला सॅमसग कंपनीचा मोबाईलही दिसून आला नाही.मुथा यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software