आर्या अन्‌ तिच्या साथीदारांचा २९ वर्षीय तरुणाला १० लाखांचा गंडा, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार, नक्की काय घडलं वाचा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नोकरीच्या शोधात असलेल्या २९ वर्षीय तरुणाला आर्या व तिच्या साथीदारांनी ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवून तब्‍बल १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी सोमवारी (१८ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. गुलमंडीतील कुंभारवाड्यात राहणाऱ्या तरुणाची फसवणूक झाली आहे. त्‍याने दिलेल्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नोकरीच्या शोधात असलेल्या २९ वर्षीय तरुणाला आर्या व तिच्या साथीदारांनी ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवून तब्‍बल १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी सोमवारी (१८ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

गुलमंडीतील कुंभारवाड्यात राहणाऱ्या तरुणाची फसवणूक झाली आहे. त्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्‍याला आर्याने कॉल करून ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवले. हॉटेलला रेटिंग करण्याचा जॉब दिला. त्‍यासाठी वेळोवेळी वेगवेगळे टास्‍क दिले. या टास्कमध्ये सुरुवातीला आदित्यला पैसेही दिले. नंतर मात्र वेळोवेळी वेगवेगळ्या रकमा घेत त्‍याच्याकडून एकूण ९ लाख ९६ हजार रुपये उकळले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी त्‍याला आर्याबरोबरच दिपाली, सरिता, दीपक तांबे नावाच्या व्यक्‍तीचे कॉल, मेसेज येत होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software