आता सिडकोत अवतरले मंगळसूत्र चोर!; भागवत ऐकण्यासाठी जाणाऱ्या वृद्धेचे मिनीगंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांची धूम!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना सिडको एन ७ मध्ये शुक्रवारी (३० ऑगस्ट) दुपारी घडली. सिडको पोलिसांनी वृद्धेच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा एकनाथ वैराळे (वय ६३, रा. राजदीप अपार्टमेंट, सावरकरनगर सिडको एन-५) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अाविष्कार चौकातून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना सिडको एन ७ मध्ये शुक्रवारी (३० ऑगस्ट) दुपारी घडली. सिडको पोलिसांनी वृद्धेच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा एकनाथ वैराळे (वय ६३, रा. राजदीप अपार्टमेंट, सावरकरनगर सिडको एन-५) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अाविष्कार चौकातून रिक्षात बसून सपना सुपर मार्केटकडे आल्या. रिक्षातून उतरून रस्ता ओलांडला. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी सिडको एन ७ येथे दत्त मंदिरात भागवत ऐकण्यासाठी जात असताना महाराणा प्रताप हौसिग सोसायटीच्या कमानीतून आत प्रवेश करून थोड्या अंतरावरच दत्त मंदिराकडून काळ्या मोटारसायकलवरून दोघे (वय अंदाजे २५ ते ३०) आले.

ते पुष्पाबाई यांच्या जवळून जात असताना अचानक मोटारसायकलवर मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण १९ ग्रॅम वजनाचे बळजबरीने हिसकावले. त्यानंतर दोघे मोटारसायकलवर भरधाव निघून गेले. मागे बसलेल्याने तोंड रूमालाने बांधलेले होते. अंगात काळपट फुल बाह्याचा शर्ट घातलेला होता. ६० हजार रुपये किंमतीने मिनीगंठण चोरीला गेल्याचे तक्रारीत पुष्पाबाई यांनी म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software