- Marathi News
- सिटी क्राईम
- आता हद्दच केली… तलवार घेऊन, हातात रायफल घेऊन फोटो टाकले व्हॉट्स ॲप ग्रुपवर!; ओव्हरगाव प्रकरणात जब्...
आता हद्दच केली… तलवार घेऊन, हातात रायफल घेऊन फोटो टाकले व्हॉट्स ॲप ग्रुपवर!; ओव्हरगाव प्रकरणात जब्बार पठाण, समीर खाँकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न?
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओव्हरगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील १७ वर्षीय पूजा शिवराज पवार हिला माझ्यावर प्रेम कर नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारतो, अशी धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधम कासीम यासीन पठाण (वय २१, ओव्हरगाव) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात अवघे गाव पीडित पूजाच्या बाजूने उभे राहिले. हर्सूल टी पॉइंट चौकात सकल […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओव्हरगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील १७ वर्षीय पूजा शिवराज पवार हिला माझ्यावर प्रेम कर नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारतो, अशी धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधम कासीम यासीन पठाण (वय २१, ओव्हरगाव) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात अवघे गाव पीडित पूजाच्या बाजूने उभे राहिले. हर्सूल टी पॉइंट चौकात सकल हिंदू समाजाने बुधवारी रास्ता रोकोही केला. एवढे सर्व वातावरण तापलेले असताना धर्मांध झालेल्यांनी मात्र गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही सोडलेला नाही. गावाला घाबरविण्यासाठी जब्बार उर्फ गफ्फारखा पठाण (वय ३०, रा. ओव्हरगाव) व सलीम खाँ जमीन खाँ (वय ३२, रा. ओव्हरगाव) या दोघांनी हातात तलवार व रायफल घेऊन रागात पाहतानाची छायाचित्रे गाव व परिसरातील नागरिकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर शेअर केली आहेत.
