- News
- सिटी क्राईम
- आणखी एक घटना : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न अयशस्वी हो...
आणखी एक घटना : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न अयशस्वी होताच शाबाज खानने आधी विनयभंग केला, नंतर मुलीच्या आई-वडिलांना शिवीगाळ, धमक्या
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरात एका धर्मांधाने हिंदू मुस्लिम महिलेला लैंगिक गुलाम बनवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न समोर आला आहे. सावज त्याच्या जाळ्यात अडकत नाही हे पाहून त्याने विकृतीचा कळस गाठला. आधी तिला रस्त्यावर अडवून छेड काढली. ती त्याला ढकलून कॉलेजला गेली. त्यानंतर […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरात एका धर्मांधाने हिंदू मुस्लिम महिलेला लैंगिक गुलाम बनवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न समोर आला आहे. सावज त्याच्या जाळ्यात अडकत नाही हे पाहून त्याने विकृतीचा कळस गाठला. आधी तिला रस्त्यावर अडवून छेड काढली. ती त्याला ढकलून कॉलेजला गेली. त्यानंतर त्याची हिंमत इतकी वाढली की तो थेट तिच्या घरी आला आणि गेटचे लॉक तोडून दरवाजा कुंपनात येत दरवाजा वाजवू लागला. तरुणीकडे पाहून अश्लील चाळे केले. नंतर तरुणीच्या आई कॉल करून शिवीगाळ केली. तिच्या वडिलांनी पोलिसांत जाण्याचा इशारा दिला असता जीवे मारण्याची धमकी दिली. धर्मांधाच्या या कृत्याने हे कुटुंब दहशतीखाली आले असून, नराधमाविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्याची मागणी होत आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शाबाज जाकेर खान पिजारे (वय २३, रा. भारतनगर, ग. नं. १९, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध २६ जुलैला गुन्हा दाखल केला आहे.

