आजीबाईला १७ हजारांचा मोह झाला, लाखाचे दागिने गमावून बसली; आज दुपारची सातारा परिसरातील घटना, नक्की काय झालं वाचा…

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आजीबाईला १७ हजारांच्या मोहापायी तब्‍बल १ लाख रुपयांचे दागिने गमवावे लागले. भामट्याने त्‍यांना तुमच्या नावावर १७ हजार रुपये आले आहेत, असे म्‍हणून मोटारसायकलीवर बसवून रेणुका माता कमानीजवळ नेले. तिथे त्‍यांचे दागिने वजन करायचे आहेत, असे म्‍हणून काढून घेतले आणि पळून गेला… ही घटना आज, २० ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास सातारा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आजीबाईला १७ हजारांच्या मोहापायी तब्‍बल १ लाख रुपयांचे दागिने गमवावे लागले. भामट्याने त्‍यांना तुमच्या नावावर १७ हजार रुपये आले आहेत, असे म्‍हणून मोटारसायकलीवर बसवून रेणुका माता कमानीजवळ नेले. तिथे त्‍यांचे दागिने वजन करायचे आहेत, असे म्‍हणून काढून घेतले आणि पळून गेला… ही घटना आज, २० ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास सातारा परिसरात घडली.

साखराबाई भिका बावसकर (वय ६५ रा. पृथ्वीनगर, सातारा परिसर) यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍या मुलगा व नातवासह राहण्यास आहेत. दुपारी दोनला नातीला त्‍यांनी फुलंब्रीला जाण्यासाठी रेणुकमाता कमान रोड हिंदुस्थान किराणा दुकानासमोरून रिक्षात बसवून दिले. नंतर घराकडे परतत असताना एक भामटा त्‍यांच्याकडे आला. तो म्हणाला की, आई माझे नाव दत्तू वाघ आहे. तुमच्या नावावर सतरा हजार रुपये आलेले आहेत. तुम्ही माझ्यासोबत चला, असे तो म्हणाल्याने आजीबाईला १७ हजारांचा मोह झाल्याने त्‍या मोटारसायकलीवर बसल्या. तो भामटा त्‍यांना रेणुकामाता कमानीजवळील गौरी मेडीकलजवळ घेऊन आला.

तिथे असलेली तिनही दुकाने त्याचे असल्याचे त्याने सांगितले. म्हणाला की, आई तुमचे गळ्यातील सोन्याचे पोतीचे वजन करायचे आहे. सोन्याचे पोती माझ्याकडे द्या. त्यामुळे आजाबाईंनी त्या माणसाकडे गळ्यातील पोती काढून दिल्या. दोन्ही पोती प्रत्‍येकी ५० हजार रुपयांच्या होत्‍या. सोन्याच्या पोती मिळताच तो पळून गेला. त्‍याचे वर्णन असे आहे : उंची ६ फूट, अंगात निळी जिन्स, पांढऱ्या चौकड्याचा शर्ट, डोक्याला टाळूच्यावर केस नसलेला, काळी मोटारसायकल त्याच्याकडे होती. वाचकहो, तुम्हालाही अशा वर्णनाचा भामटा कुठे दिसल्यास लगेचच सातारा पोलिसांना कळवा. पोलिसांनी त्‍या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्‍याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पृथ्वीराज चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software