असाही दुर्दैवी अपघात : अचानक समाेर आलेल्या पादचाऱ्याला बुलेटस्वाराची जबर धडक, बुलेटस्वार पळाला नाही, स्वतः रिक्षातून आधी हेडगेवार, नंतर महागड्या हॉस्पिटलमध्ये केले भरती!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव बुलेटस्वाराची अचानक समोर आलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. यात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २७ जुलैला दुपारी एकच्या सुमारास आकाशवाणी चौक ते मोंढा नाका रस्‍त्‍यावर घडली. अपघातानंतर बरेचदा पळून जाण्याचा प्रकार घडतो. पण या घटनेत बुलेटस्वार पळाला नाही. तर स्वतः रिक्षातून आधी हेडगेवार रुग्णालयात जखमीला आणले, त्‍यानंतर महागड्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव बुलेटस्वाराची अचानक समोर आलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. यात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २७ जुलैला दुपारी एकच्या सुमारास आकाशवाणी चौक ते मोंढा नाका रस्‍त्‍यावर घडली. अपघातानंतर बरेचदा पळून जाण्याचा प्रकार घडतो. पण या घटनेत बुलेटस्वार पळाला नाही. तर स्वतः रिक्षातून आधी हेडगेवार रुग्णालयात जखमीला आणले, त्‍यानंतर महागड्या जे. जे. पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या जखमी आयसीयूत आहे.

संतोष गोपाळ डबे (वय ५४, रा. ह. मु. विष्णुनगर प्लॉट नं व्ही.सी. 54 दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे प्रशांत कुलकर्णी यांच्या घरात भाड्याने) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या प्रकरणात त्‍यांची मुलगी नयन यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी बुलेटस्वार सूरज गणेश शिंदे (रा . गजानननगर गारखेडा परिसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डबे कुटुंब मूळचे नाशिक जिल्ह्यातील पेठचे आहेत. संतोष डबे मजुरी करतात. अपघातानंतर मदतीसाठी धावलेल्या व्यक्‍तीने डबे यांच्या मुलीला अपघाताची माहिती दिली.

त्यानंतर मुलगी व तिचा भाऊ आकाशवाणी चौकात गेले असता त्‍यांना कळले की धडक देणाऱ्या बुलेटस्वारानेच संतोष डबे यांना रिक्षात औषधोपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात नेले आहे. त्‍यामुळे नयन आणि तिचा भाऊ हेडगेवार रुग्णालयात नेले असता बुलेटस्वाराने त्‍यांना पुढील औषधोपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे कळले. त्‍यामुळे ते जे. जे. पल्स हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे संतोष डबे यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. सध्या जखमी बोलण्याची स्थितीत नाहीत. तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय वानखेडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software