अशी ही बनवाबनवी… होमगार्ड भरतीत रमेशऐवजी काळा मास्क, टोपी घालून उभा राहिला करण…, SP कार्यालयाच्या मैदानावर नक्की काय घडलं वाचा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर होमगार्ड भरतीवेळी मंगळवारी (२ सप्‍टेंबर) विचित्रच प्रकार समोर आला. करण लालचंद खोलवाल (वय २६, रा. भोयगाव, ता. गंगापूर) हा एका मूळ उमेदवाराच्या जागेवर मैदानी चाचणीसाठी उभा राहिला अन्‌ पण पोलिसांच्या नजरेतून ही बनवाबनवी सुटली नाही. भरतीत छाती, उंची मोजून गोळाफेक व १६०० मीटर धावण्याची चाचणी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर होमगार्ड भरतीवेळी मंगळवारी (२ सप्‍टेंबर) विचित्रच प्रकार समोर आला. करण लालचंद खोलवाल (वय २६, रा. भोयगाव, ता. गंगापूर) हा एका मूळ उमेदवाराच्या जागेवर मैदानी चाचणीसाठी उभा राहिला अन्‌ पण पोलिसांच्या नजरेतून ही बनवाबनवी सुटली नाही.

भरतीत छाती, उंची मोजून गोळाफेक व १६०० मीटर धावण्याची चाचणी होती. पोलीस अंमलदार अनिषा वडमारे यांच्याकडे २० उमेदवारांची जबाबदारी होती. त्यापैकी काहींनी वडमारे यांच्याकडे लघुशंकेला जाण्याची परवानगी मागितली. मूळ उमेदवार रमेश ताराचंद राठोड (रा. पैठण) हाही लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेला. त्यापूर्वीच करण स्वच्छतागृहात पोहोचला होता. त्याने रमेशचा चेस्ट क्रमांक व कपड्यांची अदलाबदली केली. त्यानंतर रमेश मैदानावरून गायब झाला. दहा मिनिटांनी उमेदवार परतले. गोळाफेक चाचणी सुरू झाल्यावर वडमारे यांना एक उमेदवार काळा मास्क, टोपी परिधान केलेला दिसला.

विचारणा केल्यावर त्याने सर्दीचे कारण सांगितले. मात्र अडखळल्याने संशय वाढून त्यांनी कसून चौकशी केली. अखेर वरिष्ठांना बोलाविण्यात आले. तेव्हा करणने मूळ उमेदवार रमेश ताराचंद राठोड (रा. पैठण) याच्याजागी मैदानी चाचणी द्यायला उभे राहिल्याची कबुली दिली. करण २१ ऑगस्टला अक्षय कृष्णा लाडच्या जागी डमी उमेदवार म्हणून उभा राहिला होता. त्यावेळी मैदानी चाचणी देण्यात तो यशस्वीही ठरला होता. त्यामुळे आत्मविश्वास वाढून त्याने पुन्हा तोच कारनामा करून पाहिला. यासाठी त्याला कैलास गंगाराम राठोड (रा. डोणगाव) याने ३० हजार रुपये दिले होते. अक्षयने २५ हजार रुपये दिल्याचे त्याने कबूल केले. करणला पोलिसांनी अटक केली असून, रमेश, कैलास व अक्षयलाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software