अल्पवयीन मुलीने दुचाकी शिकताना धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्‍यू; सावंगीच्या सारा परिवर्तनमधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अकरावीतील १६ वर्षीय मुलीने दुचाकी शिकताना पायी जाणाऱ्या ४० वर्षीय महिलेला जोरदार धडक दिली. १५ ते २० फुटांपर्यंत फरपटत नेल्‍याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटना रविवारी (७ जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हर्सूल सावंगी येथील सारा परिवर्तन सोसायटीत घडली. याप्रकरणी दुचाकी शिकवणारा तरुण आणि दुचाकी शिकणाऱ्या मुलीविरुद्ध फुलंब्री पोलिसांनी सोमवारी (८ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अकरावीतील १६ वर्षीय मुलीने दुचाकी शिकताना पायी जाणाऱ्या ४० वर्षीय महिलेला जोरदार धडक दिली. १५ ते २० फुटांपर्यंत फरपटत नेल्‍याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटना रविवारी (७ जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हर्सूल सावंगी येथील सारा परिवर्तन सोसायटीत घडली. याप्रकरणी दुचाकी शिकवणारा तरुण आणि दुचाकी शिकणाऱ्या मुलीविरुद्ध फुलंब्री पोलिसांनी सोमवारी (८ जुलै) दुपारी गुन्हा दाखल केला आहे.

संगीता संदीप कुलकर्णी (वय ४०, रा. सारा परिवर्तन, नायगाव रोड, सावंगी) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. संदीप मारोतीराव कुलकर्णी (वय ४५, रा. नायगाव रोड, सारा परिवर्तन) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. संदीप यांची पत्नी संगीता या त्यांच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जात होत्या. त्याचवेळी सोसायटीत अकरावीत शिकणारी हर्षा (नाव बदलले आहे) दुचाकी शिकत होती.

तिचा दुचाकीवरील (क्र. एमएच २० जीवाय ४९२१) ताबा सुटला आणि ती सरळ संगीता यांना जाऊन धडकली. धडक एवढी जोरात होती की, संगीता यांचे डोके नवीन बांधकाम सुरू असलेल्या कॉलमला आदळले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्षा आणि तिला दुचाकी शिकवणारा शिवदास माधव गाडेकर (वय ३८, रा. सारा परिवर्तन) या दोघांवरही फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अनंत पाचंगे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software