अबब..गृहिणीकडून सायबर भामट्यांनी लुटले २५ लाख!; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टेलिग्रामवर पार्टटाइम जॉबचा मेसेज पाठवून नंतर हजारो रुपये कमाविण्याची संधी असल्याची थाप सायबर भामट्यांनी मारली. त्‍यांच्या बोलण्यात अडकून छत्रपती संभाजीनगरातील ३७ वर्षीय गृहिणीने थोडेथोडके नव्हे तर तब्‍बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपये गमावले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्‍यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी सायबर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टेलिग्रामवर पार्टटाइम जॉबचा मेसेज पाठवून नंतर हजारो रुपये कमाविण्याची संधी असल्याची थाप सायबर भामट्यांनी मारली. त्‍यांच्या बोलण्यात अडकून छत्रपती संभाजीनगरातील ३७ वर्षीय गृहिणीने थोडेथोडके नव्हे तर तब्‍बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपये गमावले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्‍यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रोहिणी सागर भुतडा (वय ३७, रा. गारखेडा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या गृहिणी असून त्यांचे पती खासगी कंपनीत नोकरी करतात. २७ जून ते १९ जुलैदरम्‍यान ही फसवणुकीची घटना घडली. त्यांना टेलिग्रामवर नर्मदा नावाच्या महिलेने जॉबसाठी मेसेज केला. रोहिणी यांनी रिप्लाय करत कामाचे स्वरुप विचारले. नर्मदाने स्टिफन डी नावाच्या वरिष्ठासोबत संपर्क करायला सांगितले. त्याने व्हाॅट्स ॲपवर संपर्क करत ॲपल व्हेकेशन या वेबसाईटची माहिती दिली.

त्यावर हॉटेल्सच्या बुकिंगचे टास्क पूर्ण केल्यास चांगले पैसे कमावण्याची संधी असल्याचे आमिष त्‍याने दाखवले. त्‍यासाठी दहा हजार रुपये डिपॉझिट घेतले. सायबर भामटे हे रोहिणी यांना ऑनलाइन हॉटेल बुकिंगचा टास्क द्यायचे. रोहिणी टास्क पूर्ण करायच्या. त्या बदल्यात सायबर भामट्यांनी विश्वास बसावा म्‍हणून काही पैसेही दिले. मात्र नंतर परतावा थांबवून आणखी पैसे कमावण्याची संधी असल्याचे आमिष दाखवत मोठी रक्कम गुंतवायला लावली. वेगवेगळी कारणे देत भामट्यांनी त्यांच्याकडून तब्‍बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपये उकळले. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software