अनुसूचित जातीच्या महिलेचे केस कापून बेदम मारहाण; 6 महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल, पहाडसिंगपुर्‍यातील सैनिक कॉलनीतील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : 35 वर्षीय महिलेला गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन जातिवाचक शिवीगाळ करत, केस उपटत, मारहाण केल्याची तक्रार शुक्रवारी (27 सप्टेंबर) बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी गल्लीतील 6 महिला-पुरुषांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पहाडसिंगपुर्‍याच्या सैनिक कॉलनीत राहणार्‍या 35 वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : 35 वर्षीय महिलेला गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन जातिवाचक शिवीगाळ करत, केस उपटत, मारहाण केल्याची तक्रार शुक्रवारी (27 सप्टेंबर) बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी गल्लीतील 6 महिला-पुरुषांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पहाडसिंगपुर्‍याच्या सैनिक कॉलनीत राहणार्‍या 35 वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्या पती, दोन मुलींसह राहतात. गल्लीतील सर्व जण रामेश्वर येथे जाणार असल्याचे महिलेला कळले. त्यामुळे महिलेने यमुना सतिश लहाणे (मुंढे), नरसिंग चिटमवार यांना मला का नेत नाहीत, अशी विचारणा केली असता यमुना यांनी जातिवाचक शिविगाळ केली. नरसिंगने तुझ्यामुळे आमच्या देवाला कशाला बाटवायचे, तू खालच्या जातीची आहे, असे म्हणाला.

यावेळी गल्लीतील इतर लोक जमा झाले. त्यातील जय मदन टेके (वय 22 वर्षे) म्हणाला तू खालच्या जातीची आहेस, तुम्हाला तुमच्या समाजाच्या वाड्यात पाठविले पाहिजे. अंजली कपील लांडगे (काकडे) (वय 36 वर्षे) म्हणाली, की हिच्या गळ्यात मडकं बांधून हिची धिंड काढू, अनिल लोणकर (वय 40) व आकाश जनार्धन बोकडे हे म्हणाले, की हे लोक कॉलनीतून गेल्यावर गोमूत्र शिंपडून कॉलनी पवित्र करून घेऊ, असे बोलून सर्वांनी जातीवर शिवीगाळ करून डोक्यावरील केस उपटून लाथा बुक्क्याने व लाकडी काठीने मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असे तक्रारीत महिलेने म्हटले आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software