- News
- सिटी क्राईम
- अट्टल गुन्हेगार ‘खंग्या’ आता हर्सूल जेलमध्ये ‘खंगणार’!
अट्टल गुन्हेगार ‘खंग्या’ आता हर्सूल जेलमध्ये ‘खंगणार’!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लूटमार, प्राणघातक हल्ल्याचे ८ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (वय २२, रा. साजापूर शिवार) याला ‘एमपीडीए’अंतर्गत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुंडलिकनगर, जवाहरनगर, सिडको एमआयडीसी व सिडको ठाण्याच्या हद्दीत खंग्या कुप्रसिद्ध आहे. तो खंग्या श्रीरामपूरचा असून छत्रपती संभाजीनगरात त्यांने दहशत माजवली होती. श्रीरामपूरमध्येदेखील […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लूटमार, प्राणघातक हल्ल्याचे ८ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (वय २२, रा. साजापूर शिवार) याला ‘एमपीडीए’अंतर्गत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. परंतु कारवाईनंतर त्याला पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

