GOOD NEWS! छत्रपती संभाजीनगरात २ हजार कोटींच्या प्रकल्पावर शिक्कामोर्तब, ४ हजार रोजगार मिळणार!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या ‘ऑरिक सिटी’ मध्ये इलेक्ट्रिकल बाइक उत्पादन करणारी देशातील सर्वांत मोठी “अथर एनर्जी’ कंपनी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गूड न्यूज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरून शेअर केली. त्यामुळे शहरातील औद्योगिक वर्तूळात नवचैतन्य संचारले आहे. बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये अथर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बॅटरी […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या ‘ऑरिक सिटी’ मध्ये इलेक्ट्रिकल बाइक उत्पादन करणारी देशातील सर्वांत मोठी “अथर एनर्जी’ कंपनी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गूड न्यूज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरून शेअर केली. त्यामुळे शहरातील औद्योगिक वर्तूळात नवचैतन्य संचारले आहे. बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये अथर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बॅटरी संच उत्पादन करणार आहे. या प्रकल्पामुळे चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

अथर एनर्जीचे सहसंस्थापक स्वप्निल जैन यांच्याशी नुकतीच भेट झाली. कंपनीचा तिसरा ईव्ही स्कूटर प्रकल्प संभाजीनगरात उभारणार असल्याची माहिती जैन यांनी दिल्याचे फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. २०१३ मध्ये स्वप्निल जैन व तरुण मेहता यांनी अथर एनर्जीची स्थापना केली. कंपनीचे मुख्यालय बंगळुरूत असून बंगळुरूच्या व्हाइटफील्ड आणि तामिळनाडूच्या होसूर येथे कंपनीचे दोन प्रकल्प आहेत. अथरचे एकूण ५ मॉडेल्स आहेत. बजाज ऑटो, ओला इलेक्ट्रिक आणि टीव्हीएसनंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी अथर ही तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे देशभरात ८० हून अधिक शहरांत १ हजारपेक्षा अधिक फास्ट चार्जिंग पॉइंट्स आहेत.

बिडकीन ‘डीएमआयसी’ मध्ये ‘अथर एनर्जी’चा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने १७ जूनला प्रसिद्ध केले होते. या बातमीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. या प्रकल्पामुळे उद्योग जगतातील पुरवठादारांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठा व्यवसाय मिळणार आहे. या प्रकल्पातून २०२६ पर्यंत एक लाख इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यासोबतच बॅटरी संचाचे उत्पादनही होणार आहे. या प्रकल्पामुळे स्टार्ट अप आणि उत्पादन इकोसीस्टिम अधिक मजबूत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बिडकीन डीएमआयसीत अँकर प्रकल्प यावा, यासाठी सीएमआयएचे माजी अध्यक्ष नितीन गुप्ता आणि विद्यमान पदाधिकारी दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, तसेच मंत्री अतुल सावे यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

उद्योगांना अनुकूल आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या धोरणांना पोषक असे महाराष्ट्रातील वातावरण दाखवणारी ही गुंतवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औद्योगिक वाढीच्या धोरणांशी सुसंगत आहे. अथरने या गुंतवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरची निवड केल्याने. येत्या काळात मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे नक्कीच नेतृत्त्व करेल, हा विश्वास आहे. समृद्धी महामार्गाच्या प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे गुंतवणूकदार आता या भागात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी’ क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software