संमोहनावर छ. संभाजीनगरात शनिवार, रविवारी मोफत कार्यशाळा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील तापडिया नाट्य मंदिरात शनिवार (६ जुलै) व रविवारी (७ जुलै) या दोन दिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संमोहनशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक असून, इच्‍छुकांनी 9850170936 या नंबरवर संपर्क करून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील तापडिया नाट्य मंदिरात शनिवार (६ जुलै) व रविवारी (७ जुलै) या दोन दिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संमोहनशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक असून, इच्‍छुकांनी 9850170936 या नंबरवर संपर्क करून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विलक्षण शक्तीचा अनुभव देणारा आणि लाखो लोकांचे जीवन यशस्वी करणारा हा कार्यक्रम असून, आजवर हजारो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. ब्रेन पावर व माईंड कंट्रोल तंत्र याद्वारे शिकवले जाणार आहे. अभ्यासाच्या व स्वभावाच्या समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोबत येऊन एक विलक्षण अनुभव अवश्य घ्यावा, असे आयोजकांनी म्हटले आहे. संमोहनातून मनाची एकाग्रता, स्मरण शक्ती व आत्मविश्वास वाढीस लागतो. सतत राग व चिडचिडेपणा येत असल्यास कमी अथवा नष्ट होतो. नकारात्मक, नको ते विचार डोक्‍यात येत नाहीत. परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती नष्ट होते. मानवी स्नेह संबंध जुळण्यास मदत होते. डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता नष्ट होते. घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश असल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते. जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा हा राजमार्ग असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. अवश्य ऐका पाहा : https://www.facebook.com/share/r/BvSWV8TQmRRa99ah/?mibextid=0VwfS7

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software