श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेजकडून विद्यार्थिनींची लूट?; तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाने घेतली झाडाझडती!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्‍यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्कात मुलींना १०० टक्के सवलत असूनही श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेजसह साई कॉलेजकडून विद्यार्थिनींची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या दोन्ही कॉलेजची झाडाझडती घेतली. इतर मागास प्रवर्ग(ओबीसी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील(एसईबीसी) […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्‍यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्कात मुलींना १०० टक्के सवलत असूनही श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेजसह साई कॉलेजकडून विद्यार्थिनींची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या दोन्ही कॉलेजची झाडाझडती घेतली.

इतर मागास प्रवर्ग(ओबीसी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील(एसईबीसी) वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थिनींसाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसीसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत काही महाविद्यालयांकडून विद्यार्थिनींची आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेज व साई कॉलेजबद्दल तक्रारी झाल्या आहेत. त्‍यामुळे अधिकाऱ्यांनी श्रीयश कॉलेज आणि साई कॉलेजची झाडाझडती घेत कागदपत्रांची तपासणी केली. आणखी काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल तंत्र शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील एका महाविद्यालयाबाबतही तक्रार होती. तिथेही तपासणी करण्यात आली आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software