वेरूळमध्ये MTDC चे पर्यटक निवास!, २ हजारांत AC रूम, छतावरून निसर्गरम्य वेरूळ लेण्यांतील शिल्प पाहण्याचा आनंद…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ३०० मीटर अंतरावर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने (एमटीडीसी) पाच कोटी रुपये खर्चून राष्ट्रकूट पर्यटक निवास उभारले आहे. या ठिकाणी अवघ्या दोन हजारांत एसी रूम मिळेल. पर्यटकांना या निवासाच्या छतावरून निसर्गरम्य वेरूळ लेण्यांतील कैलास शिल्प पाहता येईल. या रूमचे बुकिंग ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ३०० मीटर अंतरावर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने (एमटीडीसी) पाच कोटी रुपये खर्चून राष्ट्रकूट पर्यटक निवास उभारले आहे. या ठिकाणी अवघ्या दोन हजारांत एसी रूम मिळेल. पर्यटकांना या निवासाच्या छतावरून निसर्गरम्य वेरूळ लेण्यांतील कैलास शिल्प पाहता येईल. या रूमचे बुकिंग ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून रोज ५ हजार पर्यटक, तर घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी २५ हजारांवर भाविक येतात. खासगी हॉटेलचालक एका दिवसासाठी एसी रूमचे ४ हजार रुपये भाडे आकारतात. त्‍या तुलनेत एमटीडीसीच्या पर्यटक निवासात दोन हजारांत एसी रूम मिळणार आहे. पर्यटक निवासात २० रूम, २ लोक निवास आणि १ रेस्टॉरंट आहे. निवासामध्ये अभ्यासिका, टीव्हीची व्यवस्था आहे. जेवणदेखील येथेच मिळणार आहे. ऑगस्टपासून बुकिंग सुरू होईल. खासगी हॉटेलपेक्षा खोल्यांचे दर कमी आहेत, असे एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software