…तर मंत्र्यांना विमानतळावरच घेराव!; आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांचा इशारा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धरले धारेवर…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श पतसंस्थेच्‍या ठेवीदारांनी गुरुवारी (१८ जुलै) जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. त्यांच्यासोबत या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी खासदार इम्तियाज जलीलही होते. आदर्श पतसंस्थेतील घोटाळा बाहेर येऊन वर्ष उटलून गेले, पण अजूनही ठेवीदारांना त्यांच्या कष्टाची रक्कम मिळाली नाही. पतसंस्थेवर प्रशासक नेमल्यापासून इतक्या महिन्यांपासून काय केले? किती कर्जवसुली झाली?, असे प्रश्न ठेवीदारांनी केले. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श पतसंस्थेच्‍या ठेवीदारांनी गुरुवारी (१८ जुलै) जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. त्यांच्यासोबत या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी खासदार इम्तियाज जलीलही होते. आदर्श पतसंस्थेतील घोटाळा बाहेर येऊन वर्ष उटलून गेले, पण अजूनही ठेवीदारांना त्यांच्या कष्टाची रक्कम मिळाली नाही. पतसंस्थेवर प्रशासक नेमल्यापासून इतक्या महिन्यांपासून काय केले? किती कर्जवसुली झाली?, असे प्रश्न ठेवीदारांनी केले. मात्र अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यापुढे एकाही मंत्र्याला शहरात येऊ देणार नाही. विमानतळावरच त्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा जलील यांनी यावेळी दिला.

जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, प्रशासक सुरेश काकडे यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती झाली. डॉ. बारहाते यांनी सांगितले की, आतापर्यंत २ कोटी ९० लाखांची कर्जवसुली झाली. ते एफडीत ठेवले आहे. कर्जदारांना नोटीस बजावल्या आहेत, असे त्‍यांनी सांगितले. मात्र कासवगतीने सुरू असलेल्या कारवाईवर ठेवीदारांनी संताप व्यक्‍त केला. आरोपींची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्या, तोपर्यंत जे मंत्री शहरात येतील त्यांना घेराव घालू, असा इशारा जलील यांनी दिला. आदर्श पतसंस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच ८ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.

मानकापे यांच्या जावयाकडे ४ कोटी कर्ज थकले आहे. त्यांच्याकडून आधी वसुली करा. कर्जवसुलीसाठी काही राजकीय पक्षांचा दबाव आहे का? असा सवालही त्‍यांनी केला. सहकार विभागाने पतसंस्थेच्या १८ मालमत्ता विक्रीला काढल्या. त्‍यासाठी ५ वेळा लिलाव झाला. त्‍यात केवळ ३ मालमत्ता विक्री झाल्या. त्यातून फक्त २ कोटी ९० लाख रुपये वसूल करण्यात सहकार विभागाला यश आले. गैरव्यवहार ३०० कोटींचा असून, मागील वर्षभरात केवळ ३ कोटीच वसूल केल्यामुळे ठेवीदार संतापले. वसूल केले ३ कोटी तरी वाटप करा, अशी मागणी ठेवीदारांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software