छत्रपती संभाजीनगरातील या चिंताग्रस्त, दुःखी चेहऱ्यांवर उमटलेय हास्य!; संमोहनशास्‍त्राची ही कमाल नक्की आहे काय?, आज, उद्या होणार लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिंताग्रस्त, भयग्रस्त, दुःखी चेहऱ्यांवर हास्य परत आणण्याची किमया साधली जात आहे. ही सकारात्‍मक गोष्ट लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेमुळे शक्‍य होत असून संभाजीनगरात होणाऱ्या कार्यशाळेला विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांच्या प्रतिक्रिया अत्‍यंत कुतूहलजनक आहेत. त्‍यांच्या आयुष्यात झालेला बदल सांगताना त्‍यांना आनंद […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिंताग्रस्त, भयग्रस्त, दुःखी चेहऱ्यांवर हास्य परत आणण्याची किमया साधली जात आहे. ही सकारात्‍मक गोष्ट लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेमुळे शक्‍य होत असून संभाजीनगरात होणाऱ्या कार्यशाळेला विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांच्या प्रतिक्रिया अत्‍यंत कुतूहलजनक आहेत. त्‍यांच्या आयुष्यात झालेला बदल सांगताना त्‍यांना आनंद आवरता येत नसल्याचे दिसून येते. तापडिया नाट्यमंदिरात आज, १३ ऑक्‍टोबर आणि उद्या, १४ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्‍यान ही कार्यशाळा होत असून, कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत असून नावनोंदणी अनिवार्य आहे. नाव नोंदणीसाठी 9850170936 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश अशा एक ना अनेक समस्यांवर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा रामबाण ठरत आहे. कार्यशाळेबद्दल सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी सांगितले, की मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. धैर्य, हिंमत, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्‍ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंटअभावी अनेक मुले आज संपूर्ण मानसिकता बिघडून बसत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. त्‍यांना नवे आयुष्य प्रदान करणारा, त्‍यांच्या मानसिक क्षमत विकासित करणारा करणारा सुपर माईंड पॅावर कार्यक्रम आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software