इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स संघटनेच्या अध्यक्षपदी शिल्पा दाणेकर, सचिवपदी सतीश कोलते, नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटामाटात

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स संघटनेच्या अध्यक्षपदी शिल्पा दाणेकर, सचिवपदी सतीश कोलते, सहसचिवपदी सोहेल शेख तर खजिनदार म्हणून रश्मी साळवे यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये झाला. या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२६ पर्यंत असेल. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स संघटनेच्या अध्यक्षपदी शिल्पा दाणेकर, सचिवपदी सतीश कोलते, सहसचिवपदी सोहेल शेख तर खजिनदार म्हणून रश्मी साळवे यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये झाला.

या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२६ पर्यंत असेल. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपसंचालक (नगर रचना) मनोज गर्गे व विशेष अतिथी म्हणून एस. आर. जे. पित्ती स्टीलचे कार्यकारी संचालक विनय पित्ती उपस्थित होते. संघटनेचे मावळते अध्यक्ष करीम पठाण, नवीद अख्तर, कमल राव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, इंजिनिअरिंग कॉलेजेसचे ज्येष्ठ लेक्चरर्स व स्ट्रक्चरल इंजिनिअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटीसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांच्या तज्‍ज्ञांचे लेक्चर्स आयोजित करण्यात येतील. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अपग्रेड करीत इंडस्ट्री रेडी करण्यासाठी या भागातील इंजिनिअरिंग कॉलेजेससोबत सामंजस्य करार करण्याचा मानस आहे.
-नवनिर्वाचित अध्यक्ष शिल्पा दाणेकर

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software